Sharad Pawar : शरद पवारांचं ठरलं ! रायगडावरुन वाजणार पवारांच्या लोकसभेची ‘तुतारी’

नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी शरद पवार गटाकडून एक खास सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रायगडावरुन शरद पवार गट लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे.

0
Sharad Pawar
Sharad Pawar

नगर : राष्ट्रवादी पक्ष (NCP) आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. आता हे नवे चिन्ह घेऊन लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. या नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी शरद पवार गटाकडून एक खास सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रायगडावरुन शरद पवार गट लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे.

नक्की वाचा : आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

रायगडावरुन वाजणार लोकसभेची तुतारी (Sharad Pawar)

शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळालेलं आहे. त्यामुळे या गटाकडून नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी उद्या (ता.२४) विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचे लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

‘तुतारी’ पुन्हा एकदा लोकसभा लढवण्यासाठी सज्ज (Sharad Pawar)

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या. तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी शरद पवारांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा लोकसभा लढवण्यासाठी सज्ज आहे.

हेही पहा : नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here