Sharad Pawar: रायगडावर घुमले ‘तुतारी’चे नाद; शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचं अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण आज रायगडावर करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम पार पडला.

0
Sharad Pawar
Sharad Pawar

नगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण आज रायगडावर (Raigad) करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं.

नक्की वाचा : शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; आणखी १ शेतकऱ्याचा मृत्यू

‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह निवडणूक आयोगाने केले बहाल (Sharad Pawar)

नवीन मिळालेल्या चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल ४० वर्षानंतर रायगडावर गेले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने  बहाल केले आले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आले.

पक्षाचे नाव आणि चिन्ह कायम राहण्याची शक्यता (Sharad Pawar)

आता सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. शरद पवारांना  मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

अवश्य वाचा : राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा झटका ; त्या वक्तव्यावर याचिका फेटाळली 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here