नगर : मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवार हे जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं,असं म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार निशाणा साधला. मराठा आणि ओबीसी आरक्षण (Maratha-OBC reservation) प्रश्न राज्यात चांगलाच पेटलेला असताना आज जालन्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) जन आक्रोश यात्रा काढत आहेत.
नक्की वाचा : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’;शरद पवारांचे सूचक विधान
‘शरद पवारांनी या प्रश्नावर बोलायला हवं’ (Lakshman Hake)
मनोज जरांगे यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगे पॉलिटिकल स्क्रिप्टवरती काम करत आहेत, असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.दंगली घडवण्याची ओबीसींची बॅक हिस्ट्री नाही असं म्हणत महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोपाचे काय असा सवाल करत आमच्यात फूट पाडण्याचे काम जरांगे करत असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. या प्रश्नावर शरद पवारांनी बाेलायला हवं असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला.
अवश्य वाचा : देशातील ७० कोटी जनतेला दिलासा मिळणार;तांदळासह डाळींचं उत्पादन वाढणार
‘कोणाला ही टार्गेट करण्याचा आमचा हेतू नाही'(Lakshman Hake)
जालन्यातील वडीगोद्री जवळील मंडल स्तंभापासून त्यांनी यात्रेला सुरुवात केली आहे. जालना जिल्हा ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे. कोणाला ही टार्गेट करण्याचा आमचा हेतू नसल्याचे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले. महाराष्ट्रात कुणबीच्या बोगस नोंदी झाल्या आहेत. त्या किती झाल्यात हे सरकारने सांगावे,अशी मागणी यावेळी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.