Sharad Pawar:“६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी,मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय”-शरद पवार 

0
Sharad Pawar:“६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी,मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय
Sharad Pawar:“६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी,मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय"-शरद पवार 

Sharad Pawar : येत्या ६ नोव्हेंबरपासून मी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि इतर सगळेच प्रचार सुरु करत आहोत. महाराष्ट्रातील जनता आम्हाला उत्तम साथ देईल,असं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, १०-१२ ठिकाणी जे काही थोडेफार मतभेद आहेत ते दूर होतील. जिथे दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तिथे मार्ग काढला जाईल,असं त्यांनी सांगितले.

नक्की वाचा :  शरद पवारांनी केलेल्या नक्कलेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा (Sharad Pawar)

महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते हे सध्या बंडखोरी करत आहेत.महाविकास आघाडीत हे प्रमाण अधिक दिसून येतं आहे. आता या सगळ्या बाबत शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. तसेच त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या आहेत. शरद पवार म्हणाले की,दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात.एकमेकांची सुख, दुःख सांगतात. मला खात्री आहे, महाराष्ट्रातली जनता दीपावलीच्या प्रसंगी समाधान आणि आनंदाने एकत्र येतील. मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जनतेचा आत्मविश्वास वाढो अशा सदिच्छा व्यक्त करतो असं शरद पवार म्हणालेत.

अवश्य वाचा :  ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही’- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात २०२४ ला युती विरुद्ध आघाडी लढत (Sharad Pawar)


शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती २०१९ पेक्षा या निवडणुकीत पूर्णपणे वेगळी आहे.महाराष्ट्रात २०२४ ला युती विरुद्ध आघाडी अशी लढत होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटलेत. त्यांचे चार पक्ष तयार झाले आहेत. सध्याची लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. या लढतीत सत्तेतील तीन पक्ष आणि विरोधातले तीन पक्ष असे सहा पक्ष समोरासमोर आहेत. राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष काय कामगिरी करतो ? वंचित आघाडी आणि तिसऱ्या आघाडीची कामगिरी कशी असेल? जरांगे फॅक्टरचा परिणाम कसा होईल ? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सगळ्या पक्षांचे जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. मात्र अनेक ठिकाणी समोरासमोर उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र हा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here