Sharad Pawar:शरद पवारांची सुरक्षा वाढणार,झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

0
Sharad Pawar:शरद पवारांची सुरक्षा वाढणार,झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
Sharad Pawar:शरद पवारांची सुरक्षा वाढणार,झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

Sharad Pawar : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता केंद्रीय यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रीय यंत्रणेने राज्यातील आढावा घेतला आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रणेने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) देण्याबाबत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता केंद्रीय यंत्रणा खासदार शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी संपर्क साधणार आहे. याआधीही केंद्राने खासदार शरद पवार यांना झेडप्लस सुरक्षा दिली होती, पण ती सुरक्षा पवार यांनी नाकारली होती.

नक्की वाचा : रेल्वेची तिकीट बूक प्रणाली सुलभ होणार,चार महिन्यांचा नियम रद्द

शरद पवारांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारली (Sharad Pawar)

महाराष्ट्रात काही दिवसात विधानसभा निवडणूका होणार आहे.या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी सुरक्षा आढावा घेतला. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत पुन्हा एक विनंती करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. मात्र आता ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला होत

अवश्य वाचा : उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब

शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय (Sharad Pawar)

सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासही पवारांनी नकार दिला होता. सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली होती. मात्र पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आग्रह करणार असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here