Sharad Ponkshe | समर्थांच्या चळवळीचे सामर्थ्य सावरकरांनी दाखवून दिले – अभिनेते शरद पोंक्षे

0

Sharad Ponkshe | नगर : समर्थ रामदास स्वामींच्या (Samarth Ramdas Swami) चळवळीचे सामर्थ्य तात्या सावरकरांनी (Vinayak Damodar Savarkar) दाखवून दिले. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे… हे समर्थांनी सांगितले. चळवळीचे सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. मोठ्या भावाकडून ते योगसाधना शिकले. अनन्वित यातना, छळ सहन करूनही ते खंबीरपणे जगले कारण त्यांच्या जीवनात अध्यात्मिक अधिष्ठान होते, असे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी सांगितले. येथील चौपाटी कारंजा चौकात जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

अवश्य वाचा: 10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

कार्यक्रमाला यांची उपस्थिती (Sharad Ponkshe)

सज्जनगड येथील श्रीरामदास स्वामी संस्थानचे भूषण स्वामी यांनी समर्थांचे आणि सावरकरांचे कार्य एकमेकास पूरक कसे होते? हे नेमकेपणाने सांगितले. व्यासपीठावर समर्थभक्त सुनील रामदासी आणि श्रीसमर्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर उपस्थित होते.

हे देखील वाचा: राग आला तर आला, निवडणुका चार वर्षांनी… गुलाबरावांचं वादग्रस्त वक्तव्य

त्यांनी चळवळीचे सामर्थ्य करायला भाग पाडले (Sharad Ponkshe)

पोंक्षे पुढे म्हणाले, ब्रिटिश युनिव्हर्सिटीची बॅरिस्टर पदवी घेऊन श्रीमंत होण्याचा मार्ग सावरकरांनी पत्करला असता तर त्यांचे पुतळे कोणीही उभारले नसते. फोटोही लावले नसते. अध्यात्मिक बैठकीनेच आत्मबल मिळते. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीने उचलताना गवळ्यांचे आत्मबल वाढवण्याचे कार्य केले. त्यांनी चळवळीचे सामर्थ्य करायला भाग पाडले. छत्रपती शिवरायांचीही अध्यात्मिक बैठक होती. भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते बाहेर पडत नसत. भवानी मातेच्या आशीर्वादानेच ते मोहिमेवर विजयी होत.

धर्म रक्षणासाठी अगोदर धर्मावर प्रेम असावे लागते. धर्म काय? हे माहीत असावे लागते. धर्माचे रूप आपल्याला कळले पाहिजे. हिंदू म्हणजे नेमके काय? हेच माहित नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठीच सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजींना भाषाशुद्धीचे महत्व कळले होते. त्यांनी मराठीला शुद्ध करण्याचे काम केले. भाषेचा धर्माशी संबंध. धर्माचा राष्ट्राशी आणि संस्कृतीशी संबंध. राष्ट्र वाचवण्यासाठी भाषेपासून सुरूवात करावी लागते. आपली भाषा आपल्याला माहित नाही, म्हणूनच महाराष्ट्रात मातृभाषा मराठीच्या शाळा कमी होत चालल्या. भाषेतील साहित्य मनावर संस्कार करते. भारतीयांची मूळ भाषा संस्कृत. जगाला ज्ञान-विज्ञान देणारे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले गेले. आपण भारतीय परंपरा, रूढीपासून दूर चाललो, ब्रिटिशांनी पहिला वार आपल्या भाषेवर केला. भारत स्वतंत्र झाल्यावर भाषेवरील हा वार परतवण्याचे कार्य झाले नाही. ब्रिटिशांनी शिक्षण पध्दतीतून संस्कृत भाषा गायब करत इंग्रजी आपल्या बोडख्यावर बसवली. इंग्लंडमध्ये पहिली शाळा सुरू झाली तेव्हा भारतात १२ विश्वविद्यालये होती. विश्वातील पहिला ग्रंथ ऋग्वेद आम्हाला माहितीच नाही! मन, मनगट आणि मेंदूचा विचार करते ते उत्तम शिक्षण! संतांच्या वचनांचा अभ्यास जीवनात होणे हेच खरे संत दर्शन. श्रीसमर्थांच्या पादुका म्हणजे साक्षात श्रीसमर्थच!  संतचरण कमलांचे दर्शनाने सगळ्या सुखाची उपलब्धी होते, असे त्यांनी सांगितले.

अहिंसेच्या मार्गात ताकद असती तर श्रीकृष्णाने शस्त्र उचलण्याकरिता अर्जुन प्रवृत्त होण्यासाठी ७०० श्लोकांची गीता सांगितली नसती. उपोषणाचा मार्ग दाखवला असता. श्रीरामांनी वनात रहाणारे वानरांना सोबत घेऊन चळवळीचे सामर्थ्य केलेच ना! हिंदू संस्कृतीला कोणीही संपवू शकत नाही अगदी कितीही नगरसेवक आले तरीही! हिंदू संस्कृती संपवायला निघालेले औरंगजेब-टिपू सुलतान-अकबर थकले अन् गेले. आज त्यांचे वंशज हायवेला पंक्चर काढत बसले. छत्रपती शिवराय, पेशवे, समर्थ यांचे वंशज हजारो अनुयायी तयार करत परंपरा टिकवून ठेवत आहेत हेच समर्थ पादुका दौरा सांगतो आहे, असे पोंक्षे यांनी सांगितले. स्नेहल उपाध्ये यांनी म्हटलेल्या वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मंडळाचे विश्वस्त यशवंत आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शहरासह उपनगरातील स्त्री-पुरूष भाविक विशेषतः युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here