Shardiya Navratri : ”नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावे”

Shardiya Navratri : ''नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावे''

0
Shardiya Navratri : ''नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावे''
Shardiya Navratri : ''नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी योगदान द्यावे''

Shardiya Navratri : पाथर्डी : शारदीय नवरात्र उत्सव (Shardiya Navratri) निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी सर्व शासकीय (Govt) यंत्रणांनी नवरात्र काळात योग्य समन्वयाने काम करून योगदान द्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले. मोहोटादेवी गडावर आगामी शारदीय नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभाग प्रमुखांची नियोजन बैठक मोहटादेवी मंदिरातील (Shri Mohata Devi) सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस;पुण्याला रेड अलर्ट तर नगरमध्येही जोरदार बरसणार

सर्वच शासकीय विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित

याप्रसंगी मोहटा देवस्थानचे विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी वसंत बडे, वन परिक्षेत्राधिकारी अरुण साबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वाघ, धर्मदायुक्त कार्यालयातील निरीक्षक वाय सी भागवत, अन्न व सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता मयूर जाधव, बाजीराव दहिफळे, पाथर्डी नगरपरिषदेचे अमोल मदने, ज्ञानेश्वर दहिफळे, दिगंबर आव्हाड, मोहटा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्यासह सर्वच शासकीय विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Shardiya Navratri

अवश्य वाचा: पारनेरमध्ये आमदार कोण होणार?

यावेळी मते म्हणाले, (Shardiya Navratri)

शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी आपली जबाबदारी सेवाभावी वृत्तीने व प्रामाणिकपणे पार पाडावी. वाहतुकीला अडथळे ठरणारी अतिक्रमणे त्वरित हटवावी. यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त मिळेल.देवीच्या दर्शनासाठी बहुसंख्य भाविक पाथर्डी मार्गे रस्त्याने येतात.त्यामुळे पालिकेने पाथर्डीतील विविध अतिक्रमणे अडथळा ठरणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. औषध प्रशासनाकडून खवा, तेल, व सर्व मिठायाची नमुना तपासणी करण्याची कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य परिवहन मंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. आरोग्य, पिण्याचे पाणी ,भोजन व निवास व्यवस्था तत्पर ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी वाहतूक कोंडीसह वाहतुकीचे संपूर्ण नियोजन काटेकोर पूर्ण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरचे खड्डे बुजवून रस्त्याच्या बाजूने असलेली साईड पट्टी व काटेरी झाडे झुडपे काढून घ्यावेत, अशा सूचना दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील म्हणाले, मागील वर्षीपेक्षा यंदा जास्तीचा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून नागरिकांना सुरक्षितपणे दर्शन होण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश भणगे यांनी करून आभार जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे यांनी मानले.