Share Market : शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणूक, चौघांना अटक; सायबर पोलिसांची कारवाई

Share Market : शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणूक, चौघांना अटक; सायबर पोलिसांची कारवाई

0
Share Market : शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणूक, चौघांना अटक; सायबर पोलिसांची कारवाई
Share Market : शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणूक, चौघांना अटक; सायबर पोलिसांची कारवाई

Share Market : नगर : शेअर मार्केट (Share Market) ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास सांगून फसवणूक करणाऱ्या चारजणांना गुजरातमधून (Gujarat) अटक करण्यात आली आहे. आरोपींनी एक वर्षापूर्वी एकाची ४७ लाखांची फसवणूक (Fraud) केली होती. ही कारवाई सोमवारी (ता. २८) सायबर पोलिसांनी केली.

अवश्य वाचा : महाराष्ट्राची दिव्या ठरली बुद्धिबळाची राणी! वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास

अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे

जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा (वय ४०), जिग्नेश मोहम्मदभाई कलसरिया (२७), महादेव जसूभाई गेढिया (३०), रवी रामजीभाई आजगिया (३६, सर्व रा. गुजरात), असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए-५ या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून अहिल्यानगरमधील एकाची फसवणूक झाली होती. याप्रकरणी जुलै २०२४ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता गुजरात येथील आरोपींच्या खात्यांवर पैसे ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. पोलीस पथकाने गुजरात येथे जाऊन आरोपींच्या शोध घेत सापळा रचून आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

नक्की वाचा : नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा : पालकमंत्री विखे पाटील

नागरिकांना आवाहन (Share Market)

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देतो,ऑनलाइन केवायसी अपडेट करून देतो, कौन बनेगा करोडपतीमध्ये लॉट्री लागली आहे, क्रिडिट कार्ड अॅक्टिव्ह करून देतो, पेट्रोल पंपाची एजन्सी देतो, ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करून देतो, बँक खात्याची दुसऱ्या कुणालाही माहिती देऊ नये, बँकेचे ऑनलाइन युजर आयडी, पासवर्ड, एटीएम कार्ड, सीमकार्ड देऊ नये. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे.