Share Market : शेअर मार्केटच्या नावाखाली ४८ लाखांची फसवणूक करणारा जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई 

Share Market : शेअर मार्केटच्या नावाखाली ४८ लाखांची फसवणूक करणारा जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई 

0
Share Market : शेअर मार्केटच्या नावाखाली ४८ लाखांची फसवणूक करणारा जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई 
Share Market : शेअर मार्केटच्या नावाखाली ४८ लाखांची फसवणूक करणारा जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई 

Share Market : नगर : शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली ४८ लाख ४० हजार २०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलिसांनी (Shevgaon Police Station) जेरबंद केले आहे. सागर भैय्यासाहेब अंगरखे (रा. विद्या नगर, शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रितम शामुवेल आढाव (वय-३६, रा. पैठणरोड शेवगाव) यांनी फिर्याद (FIR) दाखल केली होती.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर

जादा परताव्याचे अमिश दाखवून फसवणूक

शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी डेव्हिंड कॅफेच्या नावाने जादा परताव्याचे अमिश दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासाचे चक्र फिरवली. या गुन्ह्यातील आरोपी याने शेअर मार्केट चे ऑफिस बंद करून तेथे डेव्हिंड कॅफे कॉफी शॉप चालु करुन तो फरार झाला होता.

अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!

सापळा रचून कारवाई (Share Market)

मात्र, गुरुवार (ता. ७) आखेगाव रोड, खंडोबा मैदान येथे दुस-या डेव्हिंड कॅफे, कॉफी शॉपीच्या उदघाटन करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मुटकुळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक रामहारी खेडकर, पोलीस किशोर काळे, शाम गुंजाळ, भगवान सानप, राज् बढे, भारत अंगरखे, दादासाहेब खेडकर, ईश्वर बेरड, रोहित पालवे, नकुल फलके व नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डु यांच्या पथकाने केली.