Share Market : नगर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) जास्त नफ्याचे आमिष दाखवून चौघांची तब्बल ५० लाख ५० हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जिल्हा न्यायालयातील (District Court) लघुलेखक अर्जुन लक्ष्मण गिते (वय ३६, रा. साई सोनल अपार्टमेंट, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) शुक्रवारी (ता. २२) दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांतील गण रचनेत मोठा फेरबदल; अंतिम गट-गण रचना जाहीर
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे
विशाल तुकाराम चव्हाण (रा. गोपाल धाम सोसायटी, महालक्ष्मी उद्यान मागे, ताठे मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) व कृष्णा दगडु शिंदे (रा. आदित्य चिंतामणी कॉलनी, कुष्ठधाम रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : “मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणाबाबत चर्चेला बसावं”- चंद्रकांत पाटील
५० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक (Share Market)
आरोपी विशाल चव्हाण व त्याची पत्नी पूजा चव्हाण यांनी व्ही. सी. ब्रोकर कंपनीमध्ये शेअर मार्केटमधून ३० ते ४० टक्के नफा मिळतो असे सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त केले. गिते यांनी नोव्हेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान टप्प्याटप्याने २५ लाख ५० हजारांची रक्कम चव्हाण याच्या बँक खात्यात पाठविली. त्यावर १० टक्के परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. कोणताही परतावा न मिळाल्याने गिते यांनी रक्कम परत मागितली असता चव्हाण याने पैसे परत दिले नाही. तसेच शितल संदीप चव्हाण यांचे १३ लाख, आनंद सुरेंद्र जोशी यांचे ५ लाख व अजिनाथ आबासाहेब पाडळकर यांचे ७ लाख अशी एकुण ५० लाख ५० हजार रूपये रक्कम परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.