Share Market : शेवगाव : शेअर मार्केट फसवणूक (Fraud) प्रकरणात तालुक्यातील गदेवाडी येथील ‘इन्व्हेस्टींग डॉट कॉम’ या नावाने शेअर मार्केट (Share Market) ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्या भावांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच इतर एजंट नॉट रिचेबल झाले असून काहींनी धूम ठोकल्याची माहिती मिळत आहे.
नक्की वाचा : विजय औटी व त्याच्या सहकाऱ्यांना कायमस्वरुपी तडीपार करा; विधीज्ञ असिम सरोदे यांची मागणी
अनेक एजंट नागरिकांची फसवणूक करून फरार
शेवगाव तालुक्यातील विविध गावात शेअर मार्केट ट्रेडिंग करणारे अनेक एजंट नागरिकांची फसवणूक करून फरार झाले आहेत. परिणामी फसवणूक झालेले नागरिक हवालदिल झाले आहेत. आता गुन्हा दाखल झाल्याने, फसवणूक झालेल्या नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. फसवणुकीचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : नेदरलँड्समध्ये घुमला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
शेवगाव तालुक्यातील हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर उर्फ माउली अशोक धनवडे (रा. गदेवाडी ता. शेवगाव) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन, तालुक्यातील गदेवाडी येथील ‘इन्व्हेस्टींग डॉट कॉम’ नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या अक्षय मेशोक इंगळे, अविनाश मेशोक इंगळे या दोन बंधूंच्या विरोधात २६ लोकांची ८३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.