Share Market : शेवगाव : शेअर मार्केटच्या (Share Market) माध्यमातून शेवगाव तालुक्यात अनेकांना फसवून दीड महिन्यांपूर्वी शेअर मार्केट ट्रेडर (Stock market trader) पसार झाला होता. रविवारी (ता. १६) शेवगावमधील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला सोडून दिले. या विरोधात शेवगावमध्ये नागरिक आक्रमक झाले. नागरिकांनी रस्तारोको आंदोलन करत पोलीस प्रशासना विरोधात घोषणा दिल्या.
नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
आरोपीला दिले होते शेवगाव पोलिसांच्या ताब्यात
ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून, तालुक्याच्या पूर्व भागातील लोकांचा विश्वास संपादन करून, अनेक गुंतवणूकदारांची मोठी रक्कम घेऊन, दीड महिन्यांपूर्वी चापडगाव येथील कार्यालयाला टाळे ठोकून, एका शेअर ट्रेडर व्यावसायिकाने पोबारा केला होता. रविवारी (ता.१६) सायंकाळी तो गावाकडे येणार असल्याची खबर ठेवीदारांना मिळाल्याने, ठेवीदारांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पकडले आणि शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक
पोलिसांनी आरोपीला दिले सोडून (Share Market)
यावेळी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्जही दाखल केला. मात्र, पोलिसांनी थातूरमातूर करून, त्याला रात्री उशिरा सोडून दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.१७) सकाळी शेवगाव-गेवराई राजमार्गावर एक तासभर रास्ता रोको आंदोलन करून, शेवगाव पोलिसांचा निषेध नोंदवला.



