Share Market : नगर : पुण्यातील एका कंपनीने शेअर मार्केटमधून (Share Market) मोठा परतावा देतो, असे आमिष दाखविण्यासाठी एक सेमिनार नगर शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये घेतले. या सेमिनारमध्ये उपस्थितांनी आमिषाला बळी पडून मोठी गुंतवणूक (investment) केली. या पुण्यातील कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक (Fraud) केली. या संदर्भात गुंतवणूकदारांपैकी एकाने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुण्यातील कंपनी विरोधात गुन्हा दाखल (Filed a case) करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत.
नक्की वाचा: आम्हांला जनतेचा कौल मान्य : सुजय विखे पाटील
जिल्हा विशेष न्यायालयात मागितली दाद
पुण्यातील श्रीमंता बाझार (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक एच.आर. श्रीकांत आचार व त्यांच्या साथीदारांनी नगरमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमधून त्यांनी उपस्थितांना आमच्या कंपनीतून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार संदीप बाबुराव कोठुळे, रंगनाथ किसन आहेर, सुधीर राणुजी वाघ, प्रवीण नामदेव डौले, दिलीप रावसाहेब ठुबे आदींनी या संदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्यामुळे संदीप कोठुळे यांनी जिल्हा विशेष न्यायालयात दाद मागितली.
अवश्य वाचा : ‘त्या’ कुटुंबीयांना पराभवच मान्य नाही : खासदार लंके
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक वाढल्याची चर्चा (Share Market)
कोठुळे यांच्यातर्फे वकील महेश तवले व वकील संजय दुशिंग तसेच वकील निरंजन आढाव हे काम पाहत आहेत. कोठुळे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. त्यानुसार न्यायालयाने कोतवाली पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट फसवणुकीनंतर नगरमध्येही असाच प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक वाढल्याची चर्चा आहे.