Share Market : शेअर मार्केट फसवणूक प्रकरण; आमदार राजळेंचे गृहमंत्र्यांना साकडे

Share Market : शेअर मार्केट फसवणूक प्रकरण; आमदार राजळेंचे गृहमंत्र्यांना साकडे

0
Share Market : शेअर मार्केट फसवणूक प्रकरण; आमदार राजळेंचे गृहमंत्र्यांना साकडे
Share Market : शेअर मार्केट फसवणूक प्रकरण; आमदार राजळेंचे गृहमंत्र्यांना साकडे

Share Market : शेवगाव : शेवगाव- पाथर्डी तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक केली आहे. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार नागरिकांची फसवणूक (Fraud) झाली आहे. यातील नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळावे, याकरीता आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांचा पैसा मिळावा, अशी विनंती केली. तसेच याप्रकरणी विधानसभेतही मुद्दा उपस्थित केला.

नक्की वाचा: शालिनी विखे पाटलांचे पांडुरंगाला साकडे; पाऊस पडू दे.. शेतकरी सुखी होऊ दे.. संकटे दूर कर

ट्रेडींग कंपन्यांचे चालक व एजंट फरार

आमदार मोनिका राजळे यांनी याबाबत अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना सदरबाबी गुन्हे दाखल करणेकरीता निवेदन दिलेले आहे. या ट्रेडींग कंपन्या व एजंट कंपन्यांना टाळे लावून, शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्यांचे चालक व एजंट फरार झाले आहेत. त्यामुळे हजारो नागरीक, व्यावसायीक, गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने, मोर्चा, निवेदने देवून पोलीस स्टेशनला या शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्या व एजंटवर गुन्हे दाखल झाले आहेत.

अवश्य वाचा: जिल्हादंडाधिकाऱ्यांचे १२ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

फडणवीस यांच्याकडून योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना (Share Market)

या गुन्हयांचा तपास होवून गुन्हेगारांना पकडून गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळावेत, ही नागरिकांची अपेक्षा असुन नागरिकांनी याकामी आमदार मोनिका राजळे यांना विधानसभेत सदर बाबी जाब विचारणेकरिता मागणी केली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत. तसेच आमदार मोनिका राजळे यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा दरम्यान मतदारसंघातील विविध समस्या व विकास कामाबाबत न्याय मिळण्याकरिता मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here