Share Market : शेअर ट्रेडिंगमधून जादा परताव्याच्या आमिषाने पावणेदोन कोटींची फसवणूक

Share Market : शेअर ट्रेडिंगमधून चांगला परतावा देतो म्हणून फसवणूक

0
Share Market : शेअर ट्रेडिंगमधून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
Share Market : शेअर ट्रेडिंगमधून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

Share Market : संगमनेर: शेअर मार्केटमध्ये (Share Market) ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखवून दिल्लीच्या एका व्यक्तीने तिघांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून एकूण तीन कोटी 68 लाख 7 हजार 750 रुपये इतकी रक्कम घेऊन त्यापैकी एक कोटी 84 लाख 41 हजार 750 इतकी रक्कम परत करीत त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र एक कोटी 83 लाख 66 हजार इतक्या रकमेची फसवणूक (Fraud) केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

दोन दिवसात दहा टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष

कुषादेव बेझबुराह (रा.दिल्ली) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील सायाखिंडी येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पवार (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022 ते 2023 दरम्यान पवार यांची बेझबुराह यांच्याशी ओळख झाली. शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करत असून यामध्ये गुंतवणूक केल्यास एक दोन दिवसात कमीत कमी दहा टक्के परतावा मिळवून देतो, असे त्यांनी पवार यांना सांगितले. मात्र पवार यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर त्याने पवार यांना वारंवार संपर्क करून त्यांना फोन करून अथवा समक्ष भेटून तो करीत असलेल्या ट्रेडिंग व्यवसायाची माहिती द्यायचा. तसेच त्याने ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कशा प्रकारे करायचे आणि नफा कसा प्रकारे कमविला जातो हे समजून हे सांगून पवार यांना विश्वासात घेतले.

अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका

खात्री पटावी म्हणून गुंतवणूक रकमेचा धनादेशही दिला लिहून (Share Market)

जर तुम्हाला तुमच्या पैशांवर परतावा मिळाला नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतो तसेच खात्रीपटावी म्हणून गुंतवणूक केलेल्या रकमेचा धनादेशही लिहून दिला. यावर पवार यांना विश्वास बसला. पवार यांच्याबरोबरच इतर दोघांकडून सुद्धा त्याने विश्वास संपादन करून त्यांच्याकडूनही रक्कम घेऊन त्यांना त्याबदल्यात धनादेश दिला होता.


एकूण तीन कोटी 68 लाख 7 हजार 750 इतकी रक्कम घेऊन त्यापैकी एक कोटी 84 लाख 41 हजार 750 इतकी रक्कम परत केली. मात्र, एक कोटी 83 लाख 66 हजार इतक्या रकमेची फसवणूक केली आहे जानेवारी 2023 पर्यंत बेझबुराह हा संपर्कात होता. त्यानंतर त्याने पवार यांचे फोन उचलणे बंद केले आणि त्यानंतर तो कधीही त्यांना भेटला नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here