Share Market : शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद

Share Market : शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद

0
Share Market : शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद
Share Market : शेवगावमधील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणातील दोघे वृंदावनमधून जेरबंद

Share Market : नगर : शेअर मार्केटमधून मोठा परतावा मिळवून देतो, असे सांगत शेवगाव तालुक्यात शेअर मार्केट (Share Market) ट्रेडरांनी अनेकांची फसवणूक (Fraud) केली. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने वृंदावन (ता. मथुरा, राज्य उत्तर प्रदेश) मधून जेरबंद केले. हरिभाऊ गणपत अकोलकर (वय ३९) व महेश दत्तात्रेय हरवणे (वय ३८, दोघे रा. भायगाव, ता. शेवगाव) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.

नक्की वाचा: नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता : मंत्री विखे पाटील

मोठा परतावा देण्याचे आमिष

शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील राजेंद्र आढाव यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष हरिभाऊ अकोलकर व मंदाकिनी हरिभाऊ अकोलकर (रा. भायगाव, ता. शेवगाव) यांनी देखवत फसवणूक केली. या संदर्भात राजेंद्र आढाव यांनी १ ऑगस्टला शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

अवश्य वाचा: श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मांदियाळी

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले (Share Market)

शेवगाव तालुका व परिसरात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणाचा समांतर तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचे मित्र व नातेवाईकांकडे आरोपींबाबत चौकशी केली. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. पथकाला माहिती मिळाली की, आरोपी हे वंदावनमध्ये गेले आहेत. त्यानुसार पथकाने वृंदावन येथे जाऊन हरिभाऊ अकोलकर व महेश हरवणे यांना ताब्यात घेतले. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here