Share Market : शेअर मार्केटमध्ये गेलेले पैसे मिळविण्यासाठी तरुण करायचा राज्यभर घरफोडी

Share Market : शेअर मार्केटमध्ये गेलेले पैसे मिळविण्यासाठी तरुण करायचा राज्यभर घरफोडी

0
Share Market : शेअर मार्केटमध्ये गेलेले पैसे मिळविण्यासाठी तरुण करायचा राज्यभर घरफोडी
Share Market : शेअर मार्केटमध्ये गेलेले पैसे मिळविण्यासाठी तरुण करायचा राज्यभर घरफोडी

Share Market : नगर : शेअर मार्केटमुळे (Share Market) एक उच्चशिक्षित तरुण कर्जबाजारी झाला. गेलेले पैसे मिळविण्यासाठी त्याने बंद फ्लॅट पाहून राज्यभर चोऱ्यांचे (Theft) सत्र सुरू केले. अखेर कोतवाली पोलिसांनी (Police) या तरुणाला तुरुंगाचे दर्शन घडवले. प्रज्वल गणेश वानखेडे (रा. श्रीकृष्ण नगर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे.

अवश्य वाचा: बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

सोन्याचे दागिने व रोख रक्कम केली होती लंपास

केडगावमधील मोती नगरमध्ये असलेल्या पार्थ हाईटस येथील काही फ्लॅटमध्ये ११ एप्रिल २०२३मध्ये घरफोडी झाली होती. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. फिर्याद दाखल झाल्यापासून कोतवाली पोलिसांचे पथक तांत्रिक पुरावे जुळवत होते. त्यानुसार पथकाला प्रज्वल वानखेडे याने ही घरफोडी केल्याचे निदर्शनास आले. प्रज्वल उच्च शिक्षित असल्याने तो फोनचा वापर तांत्रिक रित्या करत राहण्याची ठिकाणे सतत बदल होता. तो पुणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर येथे ठिकाणे बदलून राहत होता.

नक्की वाचा: विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

तांत्रिक पुराव्यात प्रज्वलचे नाव (Share Market)

दरम्यान, २ जानेवारीला केडगावमधील साई गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये चोरांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. या संदर्भातही कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. या प्रकरणातही तांत्रिक पुराव्यात प्रज्वलचे नाव पुढे आले. त्यादृष्टीने कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी प्रज्वलला ताब्यात घेण्यासाठी पथकाला रवाना केले. प्रज्वल हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेगाव येथील एमआयडीसीत आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रज्वलला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पथकाने अधिक विचारपूस केली असता त्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गमावले. कर्जबाजारीपण आले. कर्ज घालवण्यासाठी त्याने घरफोड्या करण्यास सुरुवात केल्याचे पथकाला सांगितले. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन लाख ९८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहेत.