Shevgaon Police Station : शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक करणारा १२ तासात जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई

Shevgaon Police Station : शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाखांची फसवणूक करणारा १२ तासात जेरबंद; शेवगाव पोलिसांची कारवाई

0

Shevgaon Police Station : नगर : अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक (Fraud) करणारा आरोपीला शेवगाव पोलिसांनी (Shevgaon Police Station) १२ तासात ताब्यात घेतले आहे. आदित्य कुंदा अंधारे (वय २५, रा. शिवनगर, शेवगाव, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (Accused) नाव आहे. याबाबत प्रशांत महादेव नलावडे ( रा. विद्यानगर,शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवश्य वाचा : लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित

फिर्यादीत म्हटले आहे की,

शेअर मार्केट इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टिसर्व्हिसेस नावाने शेवगाव व पुणे येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपी पुणे येथून १२ तासात ताब्यात घेतला.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

यांच्या पथकाची कारवाई (Shevgaon Police Station)

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप, पोलीस अंमलदार किशोर काळे, शाम गुंजाळ, भगवान सानप, दादासाहेब खेडकर, राहुल आठरे, ईश्वर बेरड, राजू बढे, सचिन पिरगळ, रोहित पालवे व नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डु यांच्या पथकाने केली.