Shibu Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे दिल्लीत निधन

0
Shibu Soren:झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
Shibu Soren:झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

Shibu Soren: राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (Shibu Soren) यांचे आज (ता.४) निधन(Passes Away) झाले. त्यांनी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजी मधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. ८१ शिबू सोरेन हे बऱ्याच काळापासून किडनी आजाराने ग्रस्त होते. त्यांना मधुमेह आणि हृदयाची बायपास शस्त्रक्रिया देखील झाली होती.

नक्की वाचा : मराठा समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू;नवीन नियम नेमके काय ?  

शिबू सोरेन यांची राजकीय कारकीर्द (Shibu Soren)

शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आहेत. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते. चिरुडीह हत्याकांडात त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. ८१ वर्षीय शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ रोजी सध्याच्या रामगड जिल्ह्यातील गोल ब्लॉकमधील नेमरा येथे झाला. गावातील शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दिशाम गुरु यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. ते फक्त १३ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची सावकारांनी हत्या केली. त्यानंतर शिबू सोरेन यांनी त्यांचे शिक्षण सोडून सावकारांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा :  “कृषी खात्यात असंवेदनशीलपणा दाखवणारे स्पोर्ट्समध्येही मागे राहणार नाही”- सुप्रिया सुळे 

शिबू सोरेन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा १० दिवसांत सरकार पडले (Shibu Soren)

शिबू सोरेन हे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले,तेव्हा बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना दहा दिवसांत राजीनामा द्यावा लागला. २७ ऑगस्ट २००८ रोजी शिबू सोरेन दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते आमदार नव्हते. या कारणास्तव, त्यांना निवडणूक जिंकून सहा महिन्यांत विधानसभेचे सदस्य व्हावे लागले.