Shivraj Rakshe: …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य

0
Shivraj Rakshe: ...म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला';शिवराज राक्षेचं वक्तव्य
Shivraj Rakshe: ...म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला';शिवराज राक्षेचं वक्तव्य

Shivraj Rakshe :अहिल्यानगरमध्ये रविवारी (ता.२) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची (Maharashtra Keasari Compitition)उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ(Wrestler Prithviraj Mohol) हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी (Winner) ठरला. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांच्यात सामना झाला होता. मात्र या सामन्यात पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यानी पंचांशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील मारली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. यावर आता शिवराज राक्षे याने माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नक्की वाचा :  शेतकऱ्यांना मोठा दिलासा;सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ  

‘खेळाडूवर अन्याय होत असेल तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे’ (Shivraj Rakshe)

शिवराज राक्षे म्हणाला, “महाराष्ट्र केसरीत सर्वकाही चुकीचं झालं असून जनतेने ते पाहिलं आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या,असं मी म्हणालो होतो. थर्ड अम्पायरला असा थेट निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली. दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत. कुस्तीत हार जीत होत असते. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे”, असं त्याने सांगितलं.

अवश्य वाचा : औषधं होणार स्वस्त;अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा

‘पंचांनी स्वतः चूक मान्य केली’ (Shivraj Rakshe)

शिवराज पुढे म्हणाला की, “मी वारंवार हेच सांगतो होतो की रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या.पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केलं नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं”,“एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसणार नाही. तुम्ही नंतर मान्य करता की, पंचांकडून चुक झाली आहे. मग त्या पोझिशनचे पॉइंट देऊन पुढे खेळ सुरू ठेवला पाहिजे होता.पंचांनी स्वतः मान्य केलंय की, चुक झाली आहे. त्यामुळे पंचांवरही आक्षेप घेतला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्यावेळी काळजी घेतील”, असंही त्याने स्पष्ट केलं. आम्ही कोर्टात जाऊन सविस्तर विषय मांडणार आहोत. कोर्ट जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल, असंही शिवराज राक्षेने पुढे स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here