Shirdi : अहिल्यानगर : शिर्डी (Shirdi) साईबाबांच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु धार्मिक भावनेने येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही स्थानिक व्यावसायिक भाविकांची लूट करत असतात. साईचरणी अर्पण करण्यासाठी विक्री होणाऱ्या वस्तू आणि सामानांचे भाव वाढवून भक्तांची लूट करण्यात येते. वारंवार याबबत तक्रार (Complaint) करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच शिर्डी नगरपालिकेनं (Shirdi Municipality) कारवाईलाा सुरुवात केली असून तीन दुकानांना टाळं ठोकण्यात आलंय. साईभक्तांना मूळ किमतीच्या (Original Price) अधिक किंमतीत साहित्य विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई करत नगर परिषदेने या दुकानांना टाळे ठोकल्याने येथील व्यापाऱ्यांना चांगलाच जरब बसला आहे.
नक्की वाचा : दुध दरात दोन रुपयांनी वाढ;’या’दिवशीपासून लागू होणार नवे दर
शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका
शिर्डीत साई दर्शनासाठी लाखो साईभक्त येत असतात, आणि साई मंदीरात दर्शनासाठी जातांना हार-प्रसादाच्या दुकानातून हार, फुलं, प्रसाद खरेदी करतात. मात्र, भक्तांच्या श्रद्धेचा व भावनेचा गैरफायदा घेत साई मंदिर परिसरातील हार, फुलं आणि प्रसाद व्यावसायिकांकडून भाविकांची लूट केली जात असल्याचं अनेकदा समोर आलंय. साईभक्तांची होणारी फसवणूक आणि लूट लक्षात घेऊन शिर्डीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिकेने कारवाई केली आहे.

अवश्य वाचा : अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!
पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार (Shirdi)
विशेष म्हणजे या लुटीसंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाविकांकडून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या तीन दुकानांना नगरपालिकेने सील ठोकले असून पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे.