Shirdi Lok Sabha Election: संगमनेर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Election) प्रचाराच्या तोफा धडकत आहे. याठिकाणी तिरंगी लढत होत असून शिवसेना (उ बा ठा) कडून भाऊसाहेब वाकचौरे तर शिवसेना (Shiv Sena) (शिंदे गट) यांच्याकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) या आजी-माजी खासदारांमध्ये लढत होत असून वंचितकडून उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) या रिंगणात उतरल्या आहेत. लोखंडे यांनी मदार मंत्री विखेंवर तर वाकचौरे यांची कोल्हे-थोरात यांच्यावर अवलंबून आहे तर उत्कर्षा यांच्या पाठीशी कोणीही वयस्कर अनुभवी किंवा खंबीर साथ नसल्याने त्या मात्र एकट्याच रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे त्या काय करिष्मा दाखवितात याबाबत उत्सुकता आहे.
हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार
दोन्ही उमेदवारांना नेत्यांची खंबीर साथ (Shirdi Lok Sabha Election)
शिर्डी लोकसभा निवडणुकीत विरोध असतानाही विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी मिळवली. मात्र सगळे विसरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोखंडे यांना मदत करण्याचे ठरविले आणि विखे यंत्रणा कामाला लागली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिर्डीत दोन वेळा येऊन घटक पक्षांमध्ये समन्वय साधून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोखंडे यांच्या पाठीशी विखे यंत्रणा खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येते. तर गणेश कारखान्याच्या रूपाने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केल्याने आणि विवेक कोल्हे यांची मदत असल्याने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही खंबीर साथ मिळाली आहे. संगमनेर तालुक्यातील बाजार समिती, ग्रामपंचायती, पंचायत समिती विकास कार्यकारी सोसायट्या या थोरतांच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे.
नक्की वाचा : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची सुटका
प्रकाश आंबेडकरांची एकच सभा (Shirdi Lok Sabha Election)
परंतु काँग्रेसशी बंडखोरी करून वंचितकडून उमेदवारी मिळवलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्या मागे अनुभवी व्यक्ती नाही. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे खंबीरपणे उभे असले तरी शिर्डी मतदारसंघात आंबेडकर यांची एकच सभा आयोजित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वयस्कर अनुभवी व्यक्ती पाठीशी नसताना “एकला चलो रे”चा नारा देत उत्कर्षा रुपवते या निवडणुकीत उतरल्या असून जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशेष म्हणजे जनतेने हातात घेतलेली निवडणूक असून कुणाच्या पाठीशी कुणाचीही यंत्रणा असुद्या यंदा यंत्रणा नाहीतर जनता ठरवणार आहे की दिल्लीला कुणाला पाठवायचे. त्यामुळे उत्कर्षा रुपवते या काय करिष्मा दाखवणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
चौकटगेल्या दोन महिन्यांपासून मुलाला फक्त व्हिडीओ कॉलवर पाहतेय. वडिलांच्या स्वप्नासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी शिर्डी मतदारसंघातच मुक्कामी राहत असल्याची प्रतिक्रिया देताना उत्कर्षा यांचे डोळे भरून आले होते.