Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबांचरणी दिवाळीत १७ कोटीचे दान

Shirdi Saibaba : नगर : जिल्ह्यातील शिर्डीचे साईबाबा (Shirdi Saibaba) मंदिर हे देशभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लोक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. अनेक भक्त साईंच्या दानपेटीत लाखोचं दान (A donation of millions) टाकतात.

0
Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबांचरणी दिवाळीत १७ कोटीचे दान
Shirdi Saibaba : शिर्डी साईबाबांचरणी दिवाळीत १७ कोटीचे दान

Shirdi Saibaba : नगर : जिल्ह्यातील शिर्डीचे साईबाबा (Shirdi Saibaba) मंदिर हे देशभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लोक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. अनेक भक्त साईंच्या दानपेटीत लाखोचं दान (A donation of millions) टाकतात. यंदा दिवाळीच्या (Diwali) सुट्टीच्या दहा दिवसांमध्ये साईंच्या चरणी तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकं भरघोस दान संस्थानला प्राप्त झालं आहे.

१० ते २० नोव्‍हेंबर दरम्यान असलेल्या दिवाळीच्या सुट्टीत असंख्य साईभक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतलं. या दहा दिवसांच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपात तब्बल १७ कोटी ५० लाख ५६ हजार ०८६ इतकं भरघोस दान प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली. त्यामुळे या दहा दिवसांत साईबाबांच्या चरणी दररोज पावणे दोन कोटी रुपये प्राप्त झाल्याचं पाहायला मिळाले आहे.

१० ते २० नोव्‍हेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या दानामध्ये रोख स्‍वरुपात रुपये ७ कोटी २२ लाख ३९ हजार ७९४ रुपये दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाले आहेत. देणगी काऊंटरवर ३ कोटी ९८ लाख १९ हजार ३४८ रुपये, पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी २ कोटी ३१ लाख ८५ हजार ६००, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर ३ कोटी ७० लाख ९४ हजार ४२३, तर सोने ८१० ग्रॅम रक्‍कम २२ लाख ६७ हजार १८९ रुपये, चांदी ८२११.२०० ग्रॅम रक्‍कम रुपये ४ लाख ४९ हजार ७३१ यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here