Shirdi Saibaba : नगर : राज्यभरात श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनानिमित्ताने (Raksha Bandhan) उत्साहाचे वातावरण हाेते. साईंच्या शिर्डीतही (Shirdi Saibaba) मोठ्या भक्तीभावाने आणि आस्थेने राखी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. रक्षाबंधनानिमित्ताने छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील एका साईभक्ताने तब्बल ३५ किलाे वजनाची ३६ फूट लांब व ५ फूट रुंद राखी साईबाबांना (Sai Baba) अर्पण केली.
नक्की वाचा: धक्कादायक! बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार
या राखीमध्ये लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाण्यांची थीम
रक्षाबंधन निमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून प्रबोधराव यांनी ही राखी साईबाबांना समर्पित केली. ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी १० दिवसांत बनवली. यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे काम करण्यात आले आहे. साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाण्याची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहे. प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे.
अवश्य वाचा: जखणगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
विधिवत पूजन करून राखी अर्पण (Shirdi Saibaba)
या राखीचे साईबाबा संस्थानतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच राखी देणगीदार साईभक्त प्रबोधराव यांच्याहस्ते विधिवत पूजन करून अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते. आजवरच्या इतिहासात साई समाधी मंदिरात साईबाबांना रक्षाबंधनाच्या दिवशी हातात राखी बांधन्यात येते.