Shirdi Saibaba : वर्धनची जागा ‘सिम्बा’ ने घेतली; तो साई दरबारी होणार सेवेसाठी रूजू

Shirdi Saibaba : वर्धनची जागा ‘सिम्बा’ ने घेतली; तो साई दरबारी होणार सेवेसाठी रूजू

0
Shirdi Saibaba : वर्धनची जागा ‘सिम्बा’ ने घेतली; तो साई दरबारी होणार सेवेसाठी रूजू
Shirdi Saibaba : वर्धनची जागा ‘सिम्बा’ ने घेतली; तो साई दरबारी होणार सेवेसाठी रूजू

Shirdi Saibaba : नगर : शिर्डी विभागाच्या बॉम्ब शोधक पथकातील (Bomb Detection Team) वर्धन डॉग गेल्या काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाला. आता वर्धनची जागा ‘सिम्बा’ ने घेतली आहे. सिम्बा सहा महिन्यांचा झाल्यानंतर तीन महिन्यात पुण्यात स्फोटके शोधकाचे ट्रेनिंग (Explosive Detector Training) घेणार आहे. त्यानंतर तो साई दरबारी (Shirdi Saibaba) सेवेसाठी रूजू होणार आहे.

नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस

पोलीस अधीक्षक यांनी ‘सिम्बा’ची पाहणी करून माहिती घेतली

दरम्यान, शिर्डी येथील बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस अंमलदार प्रकाश साळवे, दिलीप पुरनाळे यांनी ‘सिम्बा’ला खरेदीनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ‘सिम्बा’ची पाहणी करून माहिती घेतली. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर उपस्थित होते.

अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

बॉम्ब शोधक पथकातील डॉगची महत्त्वाची भूमिका (Shirdi Saibaba)

जिल्हा पोलीस दलामध्ये क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात आणि स्फोटके शोधण्यात बॉम्ब शोधक पथकातील डॉगची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दरबारामध्ये स्फोटके शोधण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून दोन डॉगची नियुक्ती करण्यात आली आहे. हे डॉग एकप्रकारे पोलीस कर्मचार्‍याची भूमिका निभावतात. दिवसभरात तीन वेळा साई दरबाराची पाहणी केली जाते.

सध्या साई दरबारात डॉग आहे. त्याबरोबर वर्धन नावाचा डॉग होता. परंतु, तब्बल दहा वर्षांच्या सेवेनंतर वर्धन सेवानिवृत्त झाला. त्यामुळे शिर्डी बॉम्ब शोधक पथकामध्ये एका डॉगची जागा रिक्त होती. त्यासाठी पोलीस अधीक्षक ओला यांनी एका डॉगची मागणी केली होती. त्यानुसार शिर्डी बॉम्बशोधक पथकाने अडीच महिन्याच्या ‘सिम्बा’ची नामांकित संस्थेकडून खरेदी केली आहे. तो सहा महिन्याचा झाल्यानंतर त्याला पुण्यातील शिवाजीनगर येथील सीआयडीच्या डॉग स्फोटके शोधक ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंगसाठी पाठविले जाणार आहे. तीन महिन्याच्या खडतर ट्रेनिंगनंतर ‘सिम्बा’ साई दरबारामध्ये सेवेसाठी रूजू होणार आहे.