Shiv jayanti | शिवजयंती म्हणजे स्वाभिमान व प्रेरणेचा दिवस: डॉ. विलास खर्चे

रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे पहिले राजे

0

Shiv jayanti | राहुरी: २१ वे युग हे नवीन तंत्रज्ञानाचे, स्पर्धेचे युग आहे. यामध्ये आपण शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपले ध्येय ठरविले पाहिजे. सातत्य, शिस्त व मेहनतीने ते ध्येय पूर्ण केले पाहिजे. शिवाजी महाराजांचा जयंती (Shiv jayanti) उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठी स्वाभिमान तसेच संस्कृती जपण्याचा व प्रेरणेचा दिवस होय असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती (Shiv jayanti) उत्सवाचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते.

अवश्य वाचा- राहाता तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे पहिले राजे (Shiv jayanti)

  कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून कोल्हापुर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश लोळगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, सौ. सुरुची खर्चे मॅडम, नगररचना व मूल्य निधी विभागाच्या रचना सहाय्यक ललिता लोळगे व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. गणेश लोळगे यांनी ढाल तलवारीच्या पलीकडील छत्रपती शिवराय या विषयावर बोलताना म्हणाले , की रयतेचा स्वाभिमान जागा करून रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे पहिले राजे होते. शिवाजी महाराज एक उत्कृष्ट अभियंता तसेच व्यवस्थापनातील तज्ञ होते. शिवाजी महाराजांकडून बोध घ्या आणि स्वतःच्या जगण्याचा शोध घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थिताना केले.  

नक्की वाचा- मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींनी दाखवले लाठ्या काठ्यांचे प्रात्यक्षिक (Shiv jayanti)

प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्याची ओळख डॉ. विलास आवारी यांनी करून दिली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींनी लाठ्या काठ्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर शिवज्योत मिरवणुकीने प्रशासकीय इमारतीसमोर आणून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षातील विद्यार्थी मनीष भरते याने एकपात्री प्रयोग सादर केला. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस च्या छात्रांनी  श्री गुरु तेज बहादुर साहेब जी 350 वे शहीद समागम वर्ष साजरा केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य उगले व विद्यार्थिनी संस्कृती सरोदे यांनी केले तर आभार पदव्युत्तर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुदर्शन लाटे यांनी मानले.