Shiv Jayanti : कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

Shiv Jayanti : कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

0
Shiv Jayanti

Shiv Jayanti : कर्जत : कर्जत शहर आणि तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shiv Jayanti) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात सकल मराठा समाज (Maratha society) कर्जतच्यावतीने शिवाजी महाराजांच्या सिंहासन रूढ शिवप्रतिमेचे पूजन प्रमुख समन्वयक विशाल मांडगे यांच्यासह राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) आणि सावित्रीच्या लेकींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.  

हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

शिवजयंतीनिमित्त कर्जत बसस्थानक परिसर भगवामय (Shiv Jayanti)

कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १०:३० वाजता शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणांनी परिसर दुमदुमला होता. शिवजयंतीनिमित्त कर्जत बसस्थानक परिसर भगवामय झाला होता. यावेळी शालेय विद्यार्थिनीनी जिजाऊ वंदना म्हंटली. यासह शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग हुबेहूब साकारत अभिवादन केले.

नक्की वाचा: पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार? : आमदार नितेश राणे

मावळ्यांच्या वेशभूषेत शोभायात्रा मिरवणूक (Shiv Jayanti)

सकाळी ६:३० वाजता शिवजयंती उत्सवानिम्मित सर्व सामाजिक संघटना, सकल मराठा समाज कर्जत आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पर्यावरण पूरक सायकल रॅली स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यातील शिवराज नितीन नवले, अमोल रणसिंग आणि नितीन देशमुख या तिन्ही सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीनी आपली बक्षिसाची रक्कम ४ हजार ५०० रुपये वृक्ष संवर्धनाच्या पाण्याच्या टँकरसाठी दान केली. सकल मराठा समाज आणि अभिनव युवा प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. संध्याकाळी ४ वाजता पारंपरिक वाद्यसहित बँडपथक, नाशिक ढोल, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, हलगी-लेझीम आणि सनई पथक, भजनी मंडळ तसेच घोडे-उंट स्वार छत्रपती शिवाजी महाराज, माँ साहेब जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेत शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here