Shiv Jayanti 2024:‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध’: एकनाथ शिंदे

छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे 'शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे वर्णन केले

0
Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024

नगर : छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे ‘शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे वर्णन केले. किल्ले शिवनेरीवर (Shivneri) झालेल्या शिवजन्माच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थित होती. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.

नक्की वाचा : खानापूर पाझर तलाव २० वर्षानंतर प्रथमच भरला

पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून अंगात उर्जा संचारली -एकनाथ शिंदे(Shiv Jayanti 2024)

छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते. तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला,असाही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाची आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखे भारतामध्ये आणली जाणार आहेत,असं त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : बन्सी महाराज मिठाईवालेंवर प्राणघातक हल्ला करणारे जेरबंद

शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय-फडणवीस (Shiv Jayanti 2024)

फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले.अन्याय करणारा कितीही मोठा असो देव, देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामध्ये बदल करण्यात आला आहे.

अजित पवार म्हणाले, की सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे, हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करत असून गडासाठी ८३ कोटी खर्च करण्यात आले आहेत. या बरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here