Shiv Jayanti : श्रीगोंद्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

Shiv Jayanti : श्रीगोंद्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

0
Shiv Jayanti

Shiv Jayanti : श्रीगोंदा : शहरहासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shiv Jayanti) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंती कार्यक्रमात मान्यवरांच्या (Honorable) हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन (Image worship) करण्यात आले. यावेळी महाराजांची आरती म्हणून शिवगर्जना, प्रेरणा मंत्र म्हटले.

हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर


श्रीगोंदा शहरातील जोधपूर मारुती चौकातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मार्फत शिवप्रतिमा पूजन करून महिला रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, महिला बाईक रॅली, शिवव्याख्यान, बाल सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन संध्याकाळी लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. तर स्वयंभू युवा प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला त्यांनी हेल्मेट वाटप केले. बेलवंडी येथे स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

नक्की वाचा: पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार? : आमदार नितेश राणे

शिवजयंती कमिटी मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन (Shiv Jayanti)


कोळगाव येथे शिवजयंती कमिटी मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर भाषण करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना कमिटी मार्फत पारितोषिक देण्यात आले. यासह काष्टी, घारगाव, येळपणे, पिसोरे, आढळगाव यासह सर्व गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here