Shiv Jayanti : अकोले शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्साहात 

Shiv Jayanti : अकोले शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्साहात 

0
Shiv Jayanti

Shiv Jayanti : अकोले : तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने तरुणांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. मोटारसायकल व चारचाकी वाहनांना भगवे झेंडे लावून शहरात मिरवताना दिसत होते. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी शहर अक्षरशः दुमदुमून गेले होते.

हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

फुगडी खेळत कार्यकर्त्यांसोबत घेतला नृत्याचाही आनंद (Shiv Jayanti)


अकोले शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री बारा वाजता छत्रपतींच्या मेघडंबरी पुतळ्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. लहामटे दाम्पत्यांनी फुगडी खेळत कार्यकर्त्यांसोबत नृत्याचाही आनंद घेतला. सोमवारी (ता.१९) सकाळी ७ वाजता पुन्हा याच ठिकाणी आमदार डॉ. लहामटे यांनी अभिषेक करून पूजन केले. यावेळी प्रवरा, आढळा, मुळा, म्हाळुंगी, कृष्णावंती या नद्यांचे जल आणून अभिषेक करण्यात आला. पुतळा बसवताना रायगडाची माती पुतळ्याखाली टाकण्यात आली आहे. संपूर्ण तालुका व अकोलेकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा व ऐतिहासिक क्षण असल्याचे आमदार डॉ. लहामटे म्हणाले.

नक्की वाचा: पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार? : आमदार नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण (Shiv Jayanti)


त्यानंतर सकाळी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले व महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती संपूर्ण राज्यात, देशात उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घरासाठी, आपल्या वारसासाठी राज्य केले नाही. आम जनतेला सुखाचे दिवस यावे म्हणून आदर्श असा राज्य कारभार केला. परकीय शक्तीला नेस्तनाबूत करण्याचे काम या राजाने केले आहे. त्यांचा इतिहास हा रयतेचा इतिहास आहे. जनतेशी समरस होणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. जगात अनेक राजे होऊन गेले, राज्यकर्ते होऊन गेले. मात्र ते सर्व विस्मरणात गेले. फक्त एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या स्मरणात राहिले. दरम्यान, शहरासह तालुक्यातील शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्था यांमध्येही छत्रपतींना अभिवादन करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here