Shiv Jayanti : श्रीरामपूर : मराठा समाज (Maratha society) विकास सेवा प्रतिष्ठान व सकल मराठा समाज शिवजयंती (Shiv Jayanti) उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त मिरवणूक उत्साहात पार पडली. पारंपरिक वाद्य व वेशभूषा असलेल्या या मिरवणुकीतील महिला पुरुषांच्या जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणांनी शहर दुमदुमले.
हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती (Shiv Jayanti)
दरवर्षीप्रमाणे पारंपारिक वेशभूषा व वाद्यासह थत्ते मैदान येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. याठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ऐनतपूर येथील प्रगतशील शेतकरी कारभारी व लक्ष्मीबाई कुताळ, मालुंजे येथील विष्णूपंत व इंदुताई बडाख या दाम्पत्याच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, करण ससाणे, सचिन गुजर, डॉ. वंदना मुरकुटे, अरुण नाईक, सुधीर नवले, अशोक कानडे, दिपक पटारे, नितीन दिनकर, सिद्धार्थ मुरकुटे, शरद नवले, अभिषेक खंडागळे, हेमंत ओगले, देविदास चव्हाण, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन बडदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, डॉक्टर, वकील, शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब तोडमल, कार्याध्यक्ष ॲड. बाळासाहेब आगे यांनी उपस्थित मान्यवर व शिवप्रेमींचे स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. नंतर शहर व ग्रामीण भागातील मान्यावरांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
नक्की वाचा: पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार? : आमदार नितेश राणे
मराठा प्रतिष्ठानच्या मिरवणुकीचे आयोजन (Shiv Jayanti)
मराठा प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत डोली बाजा, संबळ, डफ व इतर पारंपारिक वाद्य आणि भगवे ध्वज हाती घेऊन महिला, पुरुष, युवक, युवती सहभागी झाले होते. सजविलेल्या रथामध्ये सजीव छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जीवन पवार यांनी हुबेहूब साकारल्याने ते या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक बेलापूर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पालिकेजवळ आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अर्चना पानसरे यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी गणेश शिंदे उपस्थित होते. काळाराम मंदिर रस्त्याने थत्ते मैदानावर मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी मराठा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिवजयंती उत्सव समिती, मराठा युवा समिती, महिला समिती पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.