Shiv Jayanti : नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी

Shiv Jayanti : नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी

0
Shiv Jayanti : नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी
Shiv Jayanti : नेवाशात शिवजयंती उत्साहात साजरी

Shiv Jayanti : नेवासा : नेवासा (Newasa) येथील मध्यमेश्वर नगर येथे मध्यमेश्वर युवा प्रतिष्ठानचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ३९५ वी जयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित युवकांच्या जय भवानी.. जय शिवराय.. घोषणांनी परिसर दणाणला होता.

नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन

नेवासा येथील मध्यमेश्वर युवा प्रतिष्ठानचे वतीने मध्यमेश्वर नगर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाच फूटी अर्धपुतळ्याचे पूजन मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत बालब्रम्हचारी ऋषिनाथ महाराज, पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पंढरपूरचे नगरसेवक भैय्यासाहेब बंदपट्टे, मंडलाधिकारी तृप्ती साळवे, पत्रकार प्रा. सुनील गर्जे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप म्हस्के, जयभोले तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील धोत्रे, उद्योजक पप्पुभाऊ डुकरे, रामराव सुरोसे यांच्याहस्ते पूजन होऊन अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी उद्योजक शिंदे बोलत होते.

अवश्य वाचा : जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित (Shiv Jayanti)

यावेळी मध्यमेश्वर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तात्या दगडे, दत्तात्रेय मुळे, माजी नगरसेवक भारत डोकडे, संदीप इरले, अंकुश म्हस्के, गोविंद चव्हाण, प्रसाद चौधरी, तात्या सोनवणे, गणेश मिसाळ, विशाल घोंगडे, आकाश परदेशी, ऋषी पोकळे, शुभम दगडे
पप्पू मिसाळ, ऋतिक डोकडे, दत्ता अहेर, अमोल एरले, रोहित इरले, किरण कोकाटे, बबलू झेंडे, शुभम दगडे, अजय माने, विलास इरले, किरण डाके, राहुल इरले, भैया गरुड, सचिन पवार, विकास परदेशी, राहुल चव्हाण, अजय चव्हाण, राजू डोकडे, साहिल माने, सोनू डोंगरे, वैभव आघाडे, ओम् येमे आदी उपस्थित होते.