Shiv Jayanti : शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

Shiv Jayanti : शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

0

Shiv Jayanti : कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shiv Jayanti) उत्सवानिमित्त सकल मराठा समाज कर्जत (Maratha Community Karjat) आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पर्यावरण जनजागृती (Environmental Awareness) सायकल रॅली झाली. यात शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत भरघोस प्रतिसाद दिला. या सायकल रॅलीला सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी भगवा स्वराज्य झेंडा दाखवत सुरुवात केली. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे. यासाठी सर्व धर्मियांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा : काष्टी येथे भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

Shiv Jayanti : शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
Shiv Jayanti : शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा

गुरुवार, (ता. १९) कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी कर्जत शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने तयारी करण्यात आली आहे. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोन प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. यासह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गड-दुर्ग व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सर्व परिसर भगव्या स्वराज्य ध्वजांनी आणि कमानींनी आकर्षक सजविण्यात आला आहे. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून बुधवारी सकाळी साडे सात वाजता सकल मराठा समाज कर्जत आणि सर्व सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दादा पाटील महाविद्यालय ते भैरव ग्रँड बहिरोबावाडी पर्यावरण जनजागृती सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. यात शेकडो शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठा सहभाग नोंदविला होता. 

अवश्य वाचा : संगमनेर शहरातील सोसायटीमध्ये बिबट्याच्या शिरकाव

विजेत्या मुला-मुलींसाठी प्रत्येकी स्वतंत्र सायकल बक्षीस (Shiv Jayanti)

या सायकल रॅलीच्या विजेत्या मुला-मुलींसाठी प्रत्येकी स्वतंत्र सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. ही बक्षिसे उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सवात वितरण करण्यात येणार आहेत. कर्जत शहरात गुरुवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. दुपारी ४ वाजता मिरवणूक आणि शोभायात्रा निघणार आहे. या मिरवणुकीत मर्दानी खेळ, ढोलपथक, मिरवणूक रथ, बँडपथक,  लेझीम पथक, हलगी पथक, स्टेज साउंड व पेपर ब्लास्ट तसेच स्टेज लाईट शो आणि  फटाक्यांची अतिषबाजी या मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्ये असणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी दिली.