Shiv Jayanti : राहाता : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राज्यकारभार आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याची भावना माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा (Mamta Pipada) यांनी व्यक्त केली. आज राहाता तालुक्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपाचे (BJP) नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, आरपीआयचे दिलीपराव वाघमारे, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, मदनलालजी पिपाडा, महावीरजी पिपाडा, निखील पिपाडा आदी उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नक्की वाचा : मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्त्री सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य
ममता पिपाडा म्हणाल्या की, शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर राज्य उभारले नाही, तर उत्तम प्रशासन, लोककल्याण आणि स्त्री सन्मान यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी किल्ल्यांची मजबूत व्यवस्था उभी केली, आरमार उभारले आणि शत्रूंना बुद्धी आणि पराक्रमाने पराभूत केले. त्यांच्या राज्यकारभारात स्त्रियांच्या सन्मानाला आणि सुरक्षेला उच्च स्थान होते. त्या काळात अनेक ठिकाणी स्त्रियांवर अन्याय होत असताना शिवाजी महाराजांनी स्पष्ट धोरणे आणि कठोर शिस्त लावून स्त्रीसन्मानाचे आदर्श उदाहरणे घालून दिले.
अवश्य वाचा : १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!
शिवरायांचे स्वराज्य आदर्श सुशासनाचे मॉडेल (Shiv Jayanti)
शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिले होते की शत्रूच्या प्रदेशातही स्त्रियांना कोणतीही हानी पोहोचवायची नाही. युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जात असे. शिवरायांचा राज्यकारभार हा सुयोजित प्रशासन, लोककल्याण, कठोर शिस्त आणि दूरदृष्टी यांचा आदर्श संगम होता. म्हणूनच त्यांचे स्वराज्य आजही आदर्श सुशासनाचे मॉडेल मानले जाते.



