Shiv Jayanti celebration : संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शिवजयंती सोहळा उत्साहात

Shiv Jayanti celebration : संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शिवजयंती सोहळा उत्साहात

0
Shiv Jayanti celebration

Shiv Jayanti celebration : संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti celebration) संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सालाबादप्रमाणे व महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) दिलेल्या निर्देशानुसार उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांसह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा: …तर मंत्री, आमदारांना मराठा विराेधी जाहीर करू; मनाेज जरांगेंचा इशारा

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तैलचित्राचे अनावरण (Shiv Jayanti celebration)

प्रारंभी नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे मानचिन्ह वापरण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने रामकृष्ण सभागृहात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत नगरपालिकेचे जमादार संजय देशमुख  यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यानंतर सह्याद्री विद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थी वृंदाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा  सादर करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नगर परिषदेच्या प्रांगणातून शिवरायांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत शिवराय आणि जिजाऊ यांच्या वेशभूषा केलेले नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

नक्की वाचा: शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध’: एकनाथ शिंदे

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक (Shiv Jayanti celebration)

याप्रसंगी शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून एमपीएससी व यूपीएससी या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून शासनाच्या विविध क्षेत्रातील कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत झाल्याबद्दल अशा विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या प्रांगणातून ढोल ताशांच्या गजरात निघालेली शिवरायांची मिरवणूक शहरातील बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, अशोक चौक या मार्गाने मिरवणूक निघून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी नगर परिषदेच्या वतीने शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना भगवे फेटे परिधान करण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंती सोहळ्याला नगरपरिषदेच्या सर्व शाळातील शिक्षक वृंद , विद्यार्थी तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here