Shiv Mahapuran Katha : भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन

Shiv Mahapuran Katha : भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन

0
Shiv Mahapuran Katha : भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन
Shiv Mahapuran Katha : भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन

Shiv Mahapuran Katha : नगर : भिंगार येथील शुक्लेश्वर महादेव मंदिरात २६ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत श्री शिवमहापुराण कथा (Shiv Mahapuran Katha) व २१ हजार रुद्राक्ष (Rudraksha) वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा (Samadhan Maharaj Sharma) हे शिवमहापुराण कथा सांगणार आहेत, अशी माहिती महेशभाऊ झोडगे व मित्र परिवारातर्फे देण्यात आली आहे.

Shiv Mahapuran Katha : भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन
Shiv Mahapuran Katha : भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त करण्यासाठी सहकार्य राहील – संग्राम जगताप

धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन (Shiv Mahapuran Katha)

या कथा सोहळ्यात २६ डिसेंबरला शिवपुराण महात्म्य विद्येश्वर संहिता, २७ डिसेंबरला रुद्र संहिता सती पार्वती खंड, शिवपार्वती विवाह, २८ डिसेंबरला रुद्र संहिता कुमार खंड, गणेश कार्तिकेय चरित्र, २९ डिसेंबरला रुद्र संहिता शुद्ध खंड, अर्धनारी नटेश्वर, नंदी वर्णन, ३० डिसेंबरला उमा संहिता, कैलास संहिता, ३१ डिसेंबरला बारा ज्योतिर्लिंग महात्म्य तर १ डिसेंबरला शिवमानस पूजा विधी, पंचक्षरमंत्र की महिमा, कथा समापन होईल. या शिवाय २९ डिसेंबरला सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

अवश्य वाचा : महानगरपालिकेच्या १०० बेडच्या अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात