Shiv Mahapuran Katha : शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला

Shiv Mahapuran Katha : शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला

0
Shiv Puran Katha : शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला
Shiv Puran Katha : शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला

Shiv Mahapuran Katha : राहाता : “विठ्ठल विठ्ठल चले, आयेंगे त्रिपुरारी” या भजनाच्‍या ठेक्‍यावर लाखो शिवभक्‍तांनी (Shiv Bhakt) ठेका धरून शिवपुराण कथेमध्‍ये (Shiv Mahapuran Katha) पंढरीच्‍या पांडुरंगाचा धावा केला. विश्‍वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्‍या (Pandharpur) पांडुरंगाचे आहे. जिथे कोणीही माथा टेकवू शकतो, चरण स्‍पर्श करु शकतो त्‍या पांडुरंगाच्‍या मस्‍तकावरच शिवलिंग विराजमान आहे. विठ्ठलाच्‍या भक्‍तीत सुध्‍दा महादेवच पाहायला मिळत असल्‍याचा संदेश पंडित प्रदिप मिश्रा यांनी दिला.

नक्की वाचा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अनेक मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित

शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी अस्‍तगाव येथील शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला, जिल्‍ह्याबरोबरच राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्‍येने भक्‍त शिवनगरीत दाखल झाले असून, भाविकांचा हा भवसागर विठ्ठल भक्‍तीचा मळा फुलवूत आज शिवआराधणेत तल्‍लीन होवून गेला.
जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, किरण लहामटे, माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, शिवपुराण कथेचे संयोजक डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍यासह जिल्‍ह्यासह राज्‍यातील अनेक मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते.

अवश्य वाचा : पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

पंडित मिश्रा म्‍हणाले की, (Shiv Mahapuran Katha)

पंडित मिश्रा महाराज यांनी पांडुरंगाचा उल्‍लेख करुन, आषाढी वारीला लाखो भाविक वारीच्‍या माध्‍यमातून पंढरपुरला जातात. भगवान शंकरांनी सुध्‍दा पार्वतीला घेवून, पंढरीची वारी केली, कैलास पर्वतावरुन काशी आणि पंढरी अशी त्‍यांनी केलेली वारी पंढरीत आली. भाविकांच्‍या गर्दीत पांडुरंगानेच भगवान शंकरांना आपल्‍या डोक्‍यावर बसवून नेले असा पौराणीक दाखल देवून आजही विठ्ठलाच्‍या मस्‍तकावर शिवलिंग विराजमान असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शंकराची आराधणा करायची असेल तर, अविरत साधणा करावी लागेल. स्‍वच्‍छ शरीराप्रमाणे मनाची शुध्‍दताही ठेवावी लागेल. आत्‍म्‍याची पवित्रता राखली गेली तर, मनाची पवित्रता वाढेल असे स्‍पष्‍ट करुन, पंडित मिश्रा म्‍हणाले की, मनाच्‍या पवित्रतेमुळेच भगवान शंकराची शरणागती होवू शकेल. शिवपुराण कथा ऐकून मन स्‍वच्‍छ होईल. पर्वत आणि नदीचे उदाहरण देवून पर्वताला सोडून नदी वाहून जाते. याचे कारण पर्वत कठोर आहे. जीवनामध्‍ये पर्वता इतके कठोर वागू नका, नाहीतर लोक तुम्‍हाला सोडून जातील. शिवपुराण कथा लोकांशी चांगले नाते निर्माण करायला शिकवते. आयुष्‍यात तोंडी आणि लेखी अशा दोन परिक्षा माणासांना द्याव्‍या लागतात. लेखी परिक्षेत गुण कमी जास्‍त होवू शकतात. मात्र तोंडी परिक्षेत तुम्‍ही जे बोलता त्‍यावरच गुण ठरत आसतात. महादेवांना प्राप्‍त करायचे असेल तर, मौखीक परिक्षेस उतरावे लागेल. शिवाचा जप सातत्‍याने करावा लागेल.


शिर्डीमध्‍ये यापुर्वीही अनेक मोठ्या कथा झाल्‍या. अनेक चांगले वक्‍ते आणि श्रोते आले असतील, त्‍यांना माझे नमन आहे असे सांगून मिश्रा महाराज म्‍हणाले की, कोणत्‍याही कथेला वेळ घालविण्‍यासाठी जावू नका, शिवपुराण कथा सुध्‍दा मनाने एैका, भगवान शंकराशी मनाचा संवाद साधणारी ही एक सेवा आहे. आयुष्‍यात सर्वात विचित्र दान हे कन्‍यादान आहे. वडील आपले सर्व सुख मुलीच्‍या रुपाने दान करतात त्‍याची किंमत समोरच्‍याला किती समजतात हे माहीत नाही. पण वडीलांचे दुख हे फक्‍त मुलीच समजू शकतात, हे उदाहरण देवून पंडित मिश्रा म्‍हणाले की, संसारात सर्वांना बरोबर घेवून चला. कार्तिक महीन्‍यातील हे शिवपुराण खुप पवित्र असे ठरले असल्‍याचा उल्‍लेख त्‍यांनी आवर्जुन केला.