Shiv Prahar : अखेर मंडल अधिकाऱ्यासह तलाठी निलंबित; ‘शिवप्रहार’च्या आंदोलनाची दखल

Shiv Prahar : अखेर मंडल अधिकाऱ्यासह तलाठी निलंबित; 'शिवप्रहार'च्या आंदोलनाची दखल

0
Shiv Prahar : अखेर मंडल अधिकाऱ्यासह तलाठी निलंबित; 'शिवप्रहार'च्या आंदोलनाची दखल
Shiv Prahar : अखेर मंडल अधिकाऱ्यासह तलाठी निलंबित; 'शिवप्रहार'च्या आंदोलनाची दखल

Shiv Prahar : नगर : सावेडीतील मंडल अधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर यांची तत्काळ हकालपट्टी करा, या मागणीसाठी शिवप्रहार (Shiv Prahar) संघटनेने आक्रमक हाेत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण (Hunger Strike) पुकारले. त्यावर जिल्हा प्रशासनाने (District Administration) दखल घेत, संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांना निलंबित केले असल्याची माहिती शिवप्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

नक्की वाचा: शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल

लाचलुचपत विभागाने दाखल केला होता गुन्हा

सावेडीतील मंडळ अधिकारी शैलजा देवकाते, तसेच तलाठी सागर भापकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे. तरी, हे अधिकारी त्या ठिकाणीच कामकाज करत आहे. ही भूमिका संशयस्पद असल्याने शिवप्रहार संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.

अवश्य वाचा: ‘आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख

दोघांनाही शासन सेवेतून केले निलंबित (Shiv Prahar)

त्या अनुषंगाने देवकाते व भापकर यांना २६ ऑगस्ट २०२४ अन्वये शासन सेवेतून निलंबित केले आहे, असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव, शिवाजी लहारे, माणिक झिने, निवृत्ती झिने आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here