Shiv Sena : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन

Shiv Sena : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन

0
Shiv Sena : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन
Shiv Sena : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात शिवसेनेचे आंदोलन

Shiv Sena : संगमनेर : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या महिला आघाडी व शिवसैनिकांच्या वतीने बदलापूर येथील अमानवी घटनेचा (Badlapur School Girls case) निषेध करण्यात आला असून नराधमाला फाशी देण्याच्या मागणी सोबतच पीडितांना न्याय (Justice) देण्यास विलंब करणाऱ्या गृहखात्याचा धिक्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी ‘पंधराशे नको न्याय द्या’, ‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या’ अश्या घोषणा दिल्या.

अवश्य वाचा: विकासाचा झंझावात सुरू : संग्राम जगताप

पोलिसांवर कोणाचा दबाव?

गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोपर्डी प्रकरण ते नवी मुंबई प्रकरण घडले आणि आत्ताच बदलापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. यावेळी पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केली? संबंधित संस्थाचालक कोणत्या पक्षाचे आहेत? बदलापूर येथील आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला, असे अनेक प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसैनिक अमर कतारी यांनी केली.

नक्की वाचा: ‘कर्जमुक्ती योजने’साठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले

महिलांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Shiv Sena)

जिल्हाप्रमुख खेवरे, महिला संपर्क प्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले असून आरोपीला फाशी देण्यासाठी मागणी तालुका प्रमुख शीतल हासे, उपजिल्हा प्रमुख आशाताई केदारी शहर प्रमुख संगीता गायकवाड, उपतालुका प्रमुख रेणुका शिंदे, वैशाली वडतंल्ले यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या  पदाधिकारी सोबत शिवसेना माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख गोविंद नागरे, युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, पथ विक्रेता सदस्य दीपक साळुंखे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, आरोग्य सेना जिल्हाप्रमुख अजीज मोमीन, उपशहर प्रमुख वेणुगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, समन्वयक अक्षय बिल्लाडे, विलास शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here