Shiv Sena UBT : शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

Shiv Sena UBT : शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

0
Shiv Sena UBT : शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध
Shiv Sena UBT : शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

Shiv Sena : नगर : महापालिका नगर शहरात ३६ रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क (Pay and Park) सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला नगर शहर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) विरोध दर्शवला आहे. अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करा. रस्ते मोठे आणि प्रशस्त करा आणि त्यानंतर पे अँड पार्क लागू करा, असे निवेदन शिवसेना गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड (Vikram Rathore) यांनी महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यशवंत डांगे यांना दिले आहे.

नक्की वाचा: महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत

चार चाकी वाहन लावण्यास जागा नाही

पार्किंगची समस्या नगर शहरात खूपच बिकट आहे. चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा या रस्त्यावर चार चाकी वाहन लावण्यास जागा नाही. दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेले असतात. ही समस्या सोडवण्यासाठी पार्किंगसाठी शुल्क आकारणे हा उपाय होऊ शकत नाही. महापालिका पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खासगी ठेकेदाराला देत आहे. याद्वारे महापालिकेला पाच वर्षांत २१ लाख रुपये मिळणार आहे, असा दावा कागदोपत्री केला जातो आहे. नगर शहर आणि सावेडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो होकर्स झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहे. एका तासाला टू व्हीलर ला पाच रुपये आणि फोर व्हीलर ला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Shiv Sena UBT : शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध
Shiv Sena UBT : शहरातील पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध

अवश्य वाचा: जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार

अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे पार्किंग सेवा (Shiv Sena UBT)

नगर शहरांमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात. आता अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा महापालिकेने लादलेला जिझिया कर आहे, असा आरोप शिवसेनेने निवेदनातून केला आहे.
महापालिकेने शुल्का आकारणी करू नये, ठराव विखंडित करावे अन्यथा शिवसेना या ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here