Shiv Sena UBT : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

Shiv Sena UBT : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

0
Shiv Sena UBT : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश
Shiv Sena UBT : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का; नाराज १५ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

Shiv Sena UBT : नगर : अहिल्यानगर शहरात विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेच्या ठाकरे गटात (Shiv Sena UBT) नाराजी नाट्य वाढले होते. या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटी घेतल्याची चर्चा होती. यात आता शिवसेनेचे (Shiv Sena) १५ माजी नगरसेवक शिंदे गटात उद्या प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर

विधानसभा तिकीट न मिळाल्याने नाराजी

महापालिकेच्या २०१८साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील तीन नगरसेवकांनी शिवसेनेच्या विभाजनानंतर शिंदे गटात प्रवेश केला होता. उर्वरित नगरसेवक ठाकरे गटात होते. विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तिकीट शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळावे अशी पक्षातील माजी नगरसेवकांची मागणी होती. मात्र, तिकीट न मिळाल्याने माजी नगरसेवकांत नाराजी वाढली.

अवश्य वाचा : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’

माजी नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त (Shiv Sena UBT)

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाविरोधात या माजी नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. यात माजी नगरसेवक संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी नगरसेवक सुरेश तिवारी, माजी नगरसेवक संतोष गेनप्पा, माजी नगरसेवक श्याम नळकांडे यांचा समावेश होता. हे नगरसेवक उद्या (ता. ३०) मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. मागील एक वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकीत या बंडाळीमुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.