
नगर : किल्ले शिवनेरीवर (Shivneri Fort) मोठ्या उत्साहात आज ३९५ वा शिवजन्मोत्सव (Shivjanmotsav) साजरा करण्यात आला.यावेळी शिवरायांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीला फुलांनी सजवण्यात आलं होतं. शिवजयंती निमित्त शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnvis) यांनी शिवरायांना नमन केलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इतर अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
नक्की वाचा : शिवजयंती निमित्त नरेंद्र मोदी यांची मराठीतून पोस्ट
पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा (Shiv Jayanti 2025)
शिवनेरी किल्ल्यावर ज्याठिकाणी शिवरायांचा जन्म झाला तिथे अत्यंत दिमाखात आणि पारंपारिक पद्धतीने त्यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवजन्माचा पाळणा जोजावला. त्यानंतर महिलांनी नाव ठेवत शिवाजी, शिवाजी, शिवाजी असं सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा देखील करण्यात आली.
शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात शिवरायांच्या नावाचा गजर करण्यात आला.यावेळी शिवनेरीवर अनेक साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी लहान लहान मुलांनी या साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करुन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मर्दानी खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.शिवजन्मोत्सवावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. यावेळी संपूर्ण परिसर हा शिवरायांच्याा नावाने दुमदुमला.
अवश्य वाचा : ‘आरडी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच;चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘शिवाजी महाराजांसारखा दुसरा कुठलाच आदर्श नाही’ (Shiv Jayanti 2025)
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यावेळी या गडकिल्ल्यांवर येतो, त्यावेळी एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. शिवाजी महाराजांचे किल्ले फक्त पाहण्यासाठीच नाही तर त्यामुळे त्यांचा आणि मावळ्यांचा पराक्रम देखील दिसतो. देश विदेशात या गडकिल्ल्यांची लोकप्रियता आहे.शिवाजी महाराजांसारखा दुसरा कुठलाच आदर्श असू शकत नाही. किल्ले आणि जुन्या मंदिरांचं संवर्धन आम्ही सुरू केले. याठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना सुविधा मिळाल्या पाहिजेत.मी अगोदर मुख्यमंत्री होतो आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सर्वजण टीम म्हणून या राज्याचा आणि किल्ल्यांचा विकास करू,असं आश्वासन शिंदे यांनी दिले.