Shivaji Kardile : नगर : राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत घेण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून चर्चा आहे की अजित पवार हा कारखाना चालवायला घेणार आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) असो शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील कोणीही कारखाना चालवायला घ्यावा. कारखाना सुरू राहिला पाहिजे, हाच आमचा यामागे उद्देश आहे. तनपुरे यांनी या कारखान्याचे वाटोळे केले असल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar DCC Bank) अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केला.
अवश्य वाचा : ‘त्या’ कुटुंबीयांना पराभवच मान्य नाही : खासदार लंके
कारखान्याच्या लिलावाला मंजुरी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल (गुरुवारी) झाली. या सभेत ३० क्रमांकाचा विषय राहुरीतील सहकारमहर्षी बाबूराव तनपुरे साखर कारखान्याच्या लिलावा बाबत होता. या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात पत्रकारांनी शिवाजी कर्डिले यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कारखाना चालविण्याबाबत आम्ही निविदा काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा अशा अपप्रचार सुरू आहे. की, तो कारखाना चालविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. मात्र, माझे असे मत आहे की तो कारखाना चालला पाहिजे. शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे. त्यांच्या हाती पैसे आले पाहिजे व बाजारपेठ देखील फुलली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा: आम्हांला जनतेचा कौल मान्य : सुजय विखे पाटील
कर्डिले पुढे म्हणाले की, (Shivaji Kardile)
अजित पवार यांनी टेंडर भरले काय अथवा शरद पवार असो यांनी देखील टेंडर भरले पाटील यांनी देखील निविदा प्रक्रिया भरली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी देखील निविदा भरली रक्कम जास्तीत जास्त येईल. याबाबत बोर्डाच्या बैठकीत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले.
जिल्हा बँकेने १३४ कोटी रुपयांचे कर्ज या कारखान्याला दिले आहे. आम्ही दिलेल्या कर्जाची परत वसुली व्हावी हाच आमचा यामागे उद्देश आहे. तसेच ज्या कामगारांचे थकीत पगार आहेत. तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची थकीत पगार आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचा देखील यावेळी कर्डिले यांनी सांगितले
Hi I am good 👍😊 thanks so