Shivaji Kardile : दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार – शिवाजी कर्डिले

Shivaji Kardile : दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार - शिवाजी कर्डिले

0
Shivaji Kardile : दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार - शिवाजी कर्डिले
Shivaji Kardile : दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार - शिवाजी कर्डिले

Shivaji Kardile : नगर : राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २९) बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मला देण्यात आले आहे. कारण, दुधाबाबत प्रश्न मला माहीत आहे. ते मी उद्या मांडणार असून सरसकट दूध उत्पादक (Milk Producer) शेतकऱ्यांना दहा रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी दिली. 

नक्की वाचा: लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

दूधभावा संदर्भात शेतकरी सरकारवर नाराज

नगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक व प्लांट धारकांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाभरातील उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्डिले म्हणाले की, दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा असून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. मात्र, दूधभावा संदर्भात शेतकरी सरकारवर नाराज आहे. सरकारने ५ टक्के अनुदान जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते. मात्र, जाचक अटी शर्तीमुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाही. फक्त ४० टक्के दूध उत्पादकांना लाभ झाला आहे. मात्र, उर्वरित ६० टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचलीच नाही.

Shivaji Kardile : दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार - शिवाजी कर्डिले
Shivaji Kardile : दूधवालाच दूध उत्पादकांना न्याय देणार – शिवाजी कर्डिले

अवश्य वाचा: आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज, पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

सर्वांनाच शासनाच्या अनुदानाची मदत होणे गरजेचे (Shivaji Kardile)

मंत्रालय स्तरावर सरकार निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्याची खरी गरज आहे, मात्र अधिकारी वर्ग मंत्रालयात बसूनच निर्णय घेत असतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाही त्यामुळे सरकारवर नागरिकांचा रोष निर्माण होत असतो दोन लीटर दूध उत्पादकापासून तर थेट १०० लीटर दूध उत्पादकापर्यंत सर्वांनाच शासनाच्या अनुदानाची मदत होणे गरजेचे आहे. यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या  दूध प्रश्नाबाबतच्या बैठकीत सविस्तर बाजू मांडली जाईल आणि दूध उत्पादकांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व प्लांट चालकांनी आपल्या समस्या मांडल्या. 

   
ते पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी विविध योजना तयार करून निर्णय घेत असतात मात्र त्याची अंमलबजावणी वेळेवर होत नाही आता राज्य सरकारने राज्यातील दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली मात्र अजूनपर्यंत अधिकारी वर्गाने जीआर काढला नाही. लोकसभा निवडणुकीत दुध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष भाजपला महागात पडला आहे, असे मत कर्डिले यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here