Shivaji Kardile : ‘कर्जमुक्ती योजने’साठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले

Shivaji Kardile : कर्जमुक्तीसाठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले

0
Shivaji Kardile : कर्जमुक्तीसाठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले
Shivaji Kardile : कर्जमुक्तीसाठी आधारची केवायसी गरजेची : शिवाजी कर्डिले

Shivaji Kardile : नगर : महात्मा जाेतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) शेतकरी कर्जमुक्ती याेजना २०१९ अंतर्गत प्राेत्साहनपर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरीत आधार (Aadhaar) प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केले.

नक्की वाचा: धक्कादायक! बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार

१३ ॲागस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करावे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या सभासदांनी १३ ॲागस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावयाचे आहे. यासाठी सुविधा सीएससी सेंटरवर उपलब्ध आहे. वरील कालावधीत संबंधित शेतकरी सभासदांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. ३४७ रेकॉर्डधारक लाभार्थी शेतकरी सभासदांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधाण्याचे आवाहनही कर्डिले यांनी केले.

अवश्य वाचा: जखणगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना लाभ (Shivaji Kardile)

बँक मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले की, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८ सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे. या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज बँकेचे विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना पीक कर्जाची रक्कम रुपये ५० हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता दिलेली होती. अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये ५० हजार या कमाल मयदित प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आलेली होती.

नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासन निर्णयानुसार १७९२६० खाते वरील कालावधीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांचे रेकॉर्ड शासनाचे पोर्टलवर अपलोड केलेले होते. यापैकी १०१११४ सभासदांचे आधार प्रमाणीकरणसाठी खाते प्राप्त झालेले होते व १००७६७ सभासदांची आधार प्रमाणीकरण करुन घेतले होते. बँकेच्या माध्यमातून ९२८११ सभासदांना रुपये ३२६.५२ कोटी प्रोत्साहनपर रक्कम सभासदांच्या सेव्हिंग खाती जमा झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here