Shivaji Kardile : नगर : राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी इनजेनियस लीडरशिप समिट देशपांतळीवरील आयकॉनिकलीडर अवॉर्ड २०२४ या वर्षी गोव्यातील विंडफ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पा वर्का या पंचतारांकित रिसॉर्ट येथे झाला. देशपांतली वरील जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उत्कृष्ट चेअरमन म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (ADCC Bank) अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांना ‘बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर’ (Best Chairman of the Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय सहकारी संघचे अध्यक्ष दिलीप संघवी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
नक्की वाचा : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष अनंत शेट, गोवा राज्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फल देसाई, तसेच भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी शिवाजी कर्डिले म्हणाले, (Shivaji Kardile)
जिल्हा बँकेवर विश्वास ठेऊन १० हजार कोटी रुपयांच्या वर ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज येणी बाकी असून मी जिल्हा बॅंक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून शेतकरी व समाजातील शेवटचा घटकांची सेवा करण्याचे कार्य केल्याने मला हा पुरस्कार मिळाला. राजकीय जीवनात हा पहिलाच पुरस्कार असल्याचेही माहिती शिवाजी कर्डिले यांनी दिली.