Shivaji Kardile : मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू – शिवाजी कर्डिले

Shivaji Kardile : मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू - शिवाजी कर्डिले

0
Shivaji Kardile : मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू - शिवाजी कर्डिले
Shivaji Kardile : मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू - शिवाजी कर्डिले

Shivaji Kardile : नगर : विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) मधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला. दोन वर्षांपूर्वी राहुरी तालुक्यात हिंदू बांधवांवर काही जातीवादी समाजकंटकांनी अन्याय केला. त्यावेळी मी मताचे राजकारण न करता धावून गेलो आणि हिंदू धर्म (Hinduism) वाचवण्यासाठी काम केले. राजकारणापेक्षा (Politics) हिंदू धर्म टिकला पाहिजे. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केले.

Shivaji Kardile : मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू - शिवाजी कर्डिले
Shivaji Kardile : मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू – शिवाजी कर्डिले

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल

श्री शिव महापुराण कथेचे आयोजन

भिंगार येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्र मंडळातर्फे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आमदार शिवाजी कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महेश झोडगे, अमित धाडगे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन

कर्डिले पुढे म्हणाले की, (Shivaji Kardile)

धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असतात त्या माध्यमातून धार्मिकता जोपासली जाते. राज्यातील महायुतीचे सरकार हे महाराजांच्या धार्मिकतेच्या प्रचार व प्रसारामुळे आले आहे. समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असल्यामुळेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हिंदू धर्म वाढीसाठी काम करीत आहे. आता माझ्यावर मोठी जबाबदारी पडली असून ती मी नक्कीच पार पाडेल, असे त्यांनी स्पष्ट केले.