नगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) १२ किल्ल्यांचा (12 Forts) समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने याविषयीची मागणी केली होती. ती मागणी आता मान्य करण्यात आली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार
कोणकोणत्या किल्ल्यांचा असणार समावेश ? (Shivaji Maharaj Forts)
जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या आहेत.
अवश्य वाचा : विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ७८ लाखांची फसवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती (Shivaji Maharaj Forts)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या या निर्णयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची गोष्ट ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचं म्हटलं. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे यासाठी सहकार्य लाभल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील ४२ वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ह्ज या पाच स्थळांचा या आधीच समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश होणार आहे. या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती. जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत.