Shivajirao Kardile : नगर : जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या दुःखद निधनानंतर पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी कर्डिले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
पोपटराव पवार म्हणाले,
“शिवाजीराव कर्डिले यांच्यामुळे ग्रामीण भाग आणि समाजाचा मोठा तोटा झाला आहे. ते आणि मी एकाच काळात बाजार हिवरे व बुऱ्हानगर गावच्या सरपंच पदावर कार्यरत होतो. त्यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने काम केले आणि सरपंच, आमदार, मंत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली.
अवश्य वाचा : कर्मचारी महिलेला ५० हजारांचा गंडा; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
त्यांच्या जाण्याने ग्रामीण भाग, कुटुंब, समाजाचे मोठे नुकसान (Shivajirao Kardile)
शिक्षण कमी असले तरी त्यांनी अनुभवातून कार्यकुशलता सिद्ध केली. त्यांचा लोकसंपर्क विलक्षण होता आणि प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ते एका फोनवर सोडवत. सकाळी सात वाजता त्यांचा लोकदरबार सुरू होत असे, ओपीडी संपल्यावर ते दहापर्यंत दशक्रिया विधींना उपस्थित राहत आणि दिवसभर विकासाच्या प्रश्नांवर काम करीत. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भाग, कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजाचे मोठे नुकसान झाले आहे,” असे भावनिक उद्गार पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.



