Shivajirao Kardile : नगर : राहुरी, नगर, नेवासा आणि पाथर्डी तालुक्यांना संजीवनी ठरलेल्या वांबोरी चारी टप्पा-१ आणि टप्पा-२ या सिंचन योजनांना स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी वैभव ढाकणे (Vaibhav Dhakane) यांनी सर्व लाभधारक ग्रामस्थांच्या सहीसह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे केली आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या दूर
या योजनेमुळे सुमारे ४५ गावातील १०२ पाझर तलावांना पाणीपुरवठा होत आहे. डोंगराळ आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या दूर झाल्या आहेत. १९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारमधील उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेण्यात स्व. आमदार कर्डिले यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
अशी करण्यात आली मागणी (Shivajirao Kardile)
१९९0-91 साली माजी खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकल्पावर प्राथमिक बैठक घेतली होती. कर्डिले यांच्या प्रयत्नांमुळे १९९९ मध्ये योजनेला मंजुरी मिळाली आणि २०११ मध्ये ती कार्यान्वित झाली. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाचा लाभ मिळत आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या योजनेला “स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले वांबोरी चारी टप्पा-१” आणि “स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले वांबोरी चारी टप्पा-२” अशी नावे देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला सर्व लाभधारक गावातील ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा असून, या प्रसंगी सरपंच श्रीकांत आटकर, सोमनाथ कुऱ्हे, शिवाजी पालवे, बाबाजी पालवे, अजिंक्य शिंदे, शरद कुऱ्हे, देविदास शिंदे, निलेश कदम, आबा गरुड, संदीप दानवे, ओंकार आव्हाड आदी उपस्थित होते.



